धर्माबाद युवक काँग्रेस च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

 



धर्माबाद- (अहमद लड्डा) 


युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती ऊर्फ पप्पू पाटील कोंढेकर, नांदेड शहर अध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि 23 जुलै रोजी तहसील कार्यलय धर्माबाद येथे आज युवक काँग्रेसतर्फे युजीसी च्या जाचक निर्णयाविरुद्ध थेट राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार दतात्रय शिंदे यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे निवेदनाद्वारे युजीसी द्वारा अंतिम वर्षाची परीक्षा घेण्या संदर्भात जो निर्णय घेतला आहे,त्या निर्णया विरोधात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी रीतसर पत्र पाठवून भावना व परिस्थिती कळविली होती मात्र यूजीसी ने त्यानंतर देखील परीक्षा घेण्यासाठी निर्णय काढला यामुळे महामहिम राष्ट्रपती यांना निवदेन देऊन अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्यात यावी,अशी मागणी केली.कोरोना च्या या कठीण परिस्थितीत परीक्षा घेतल्यास विध्यार्थी व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका होऊ शकते.तसेच परीक्षा शुल्क माफ करण्यात यावा अश्या विविध मागण्या युवक काँग्रेस कडून निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी रुद्रा पाटील कदम युवक जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया , हनुमंत पाटील नरवाडे,निलेश पाटील बाळापूरकर, संजय कदम, राजू पाटील, सतीश पवार. साहेबराव पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या