- शिक्षकांचा पेन्शनचा अधिकार नाकारणाऱ्या मसुद्याविरोधात....!
नांदेड * दि . (प्रतिनिधी)
10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी *शिक्षक भारती नांदेड जिल्हा शाखेच्यावतीने* बुधवार दि.( 22) रोजी एक दिवसाचे पोस्टर आंदोलन करण्यात आले.
जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचविणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक आहे . सदर मसुदयामुळे राज्यातील लाखों शिक्षक कर्मचारी यांच्या पेन्शनचा अधिकार नाकारण्यात येवू शकतो. यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने 22 जुलै रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करण्यात आले.लॉकडाऊनमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी घराबाहेर पडू शकत नाहीत .त्यामुळे घरात राहून सदर आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. कार्डपेपर अथवा कार्डबोर्ड यावर सदर अधिसुचनेला आपला विरोध दर्शवणारी शिक्षण मंत्री जागे व्हा ! अधिसूचना रद्द करा, माझी पेन्शन माझा अधिकार, प्रचलित नुसार अनुदान द्या, जय शिक्षक भारती अशा आशयाची वाक्य पोस्टर वरती लिहून 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्याची मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली .याशिवाय सदर अधिसूचनाबाबचा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा लेखी आक्षेप पोस्टाने मंत्रालयापर्यंत दिनांक 10 ऑगस्ट पूर्वी पोहचविण्यात येणार असून याबाबत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर घाला घालणारी ही उपरोक्त नमुद अधिसूचना रद्द होऊन प्रचलित पद्धतीनुसार अनुदान वितरित होईपर्यंत आणि जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत शिक्षक भरतीचा लढा सुरु ठेवणार असल्याचे *शिक्षक भारतीचे नांदेड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके यांनी सांगितले*. या पोस्टर आंदोलनात चंद्रकांत कुणके,शिवाजी राठोड, अमोल कुलकर्णी,रामेश्वर गायकवाड, गोविंद घोडके,जगजीतसिंह ठाकूर,विश्वनाथ पेटकर,बाबू घोडके, हनिफ शेख,बालाजी गादगे ,अरविंद जाधव,आदिंसह जिल्हयातील सर्व पदाधिकारी,तालुकाध्यक्ष ,सर्व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
COMMENTS