बीड ( प्रतिनिधी )
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेपामुळे आंतर जिल्हा बदली व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेत वर्षानुवर्षे होत असलेला मानसिक व आर्थिक ञास कमी करून शिक्षकांच्या पारदर्शक ऑनलाईन बदल्या करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेल्या महाराष्ट्राच्या कर्तृत्ववान माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे ह्या दि 24 जुलै रोजी शुक्रवारी दुपारी 2 वा. मराठवाड्यातील शिक्षकांशी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून संवाद साधणार असल्याची माहिती या ऑनलाईन बैठकीचे संयोजक भाजपा नेते तथा डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीचे माजी चेअरमन शिक्षक पदवीधर नेते रमेशभाऊ पोकळे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्वसामान्य शिक्षकांना, विधवा महिला भगिनी, दिव्यांग बंधू भगिनी यांना व ज्यांचा राजकीय वशिला नाही अश्या लाखो शिक्षकांना ऑफलाईन बदली प्रक्रिया च्या नावाखाली प्रत्येक वर्षी राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेपामुळे प्रचंड आर्थिक व माणसिक पिळवणूक होत असे त्यामुळे या संदर्भात सर्व सामान्य शिक्षका मध्ये असलेली खदखद तत्कालीन ग्रामविकास मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या कानावर गेल्यामुळे या संदर्भात तातडीने पंकजाताई यांनी महाराष्ट्र मध्ये शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचे स्वागत व कौतुक महाराष्ट्रासह देशभरात झाले हे कोणीही नाकारू शकत नाही. परंतू महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार बदलले व शिवसेना राष्ट्रवादी - कॉंग्रेस चे सरकार महाराष्ट्रात आले ग्रामविकास मंत्री म्हणून ना हसन मुश्रीफ यांच्याकडे कार्यभार आला. या नविन आलेल्या सरकार ने भाजपा सरकार ने घेतलेले अनेक लोककल्याणकारी निर्णय बदलण्याचा चंग बांधला असल्याचे दिसत आहे.यामुळेच शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया संदर्भात चा पंकजाताई मुंडे यांनी घेतलेला शासन निर्णय बदलुन ऑफलाईन बदल्या करण्याचे जाहिर केले आहे. या संदर्भात पंकजाताई मुंडे यांच्यासह शैक्षणिक क्षेञातील अनेक मान्यवरांनी आपली तीव्र नाराजी या पुर्वीच व्यक्त केलेली आहे. शासनाने सध्या ऑनलाईन व ऑफलाईन बदली प्रक्रियेत स्थगिती देऊन गोंधळ निर्माण केला असल्याने शिक्षका मध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.
शिक्षकांच्या ऑनलाईन व ऑफलाईन बदली प्रक्रिये संदर्भात माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या समवेत दि.24 जुलै 2020 रोजी दुपारी 2 वा मराठवाड्यातील शिक्षक व संघटना प्रतिनिधी व शिक्षणप्रेमी मान्यवर यांच्याशी ऑनलाईन संवाद आयोजित केला असल्याची माहिती या ऑनलाईन बैठकीचे संयोजक भाजपाचे प्रदेश कार्यसमिती सदस्य तथा शिक्षक पदवीधर नेते रमेशभाऊ पोकळे यांनी दिली आहे.
COMMENTS