पूर्णा (संतोष पुरी) पूर्णा येथील डॉ. आंबेडकर नगर व सिद्धार्थ नगर या दलित वस्तीमध्ये जुने रेल्वे लोको शेड जवळील पाण्याच्या टाकी (झोडपे यांच्या निवासस्थाना जवळील विद्युत डेपो) पासून ते मनोज खंडागळे यांच्या घरापर्यंत विद्युत फुल गेल्या अनेक वर्षापासून नाहीत त्यामुळे या भागामध्ये अंधार आहे लोको शेड जवळील रोडवर दिवसभर वाहनांची व नागरिकांची रहदारी जास्त असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
१) या भागात कर्मचारी वर्ग जास्त असून कोणत्याही वेळी अंधारात कामावर जावे लागते. अंधाराचा फायदा घेऊन चोरीचे व लुटमारीचे प्रमाण वाढत आहेत.
नवीन विद्युत पोल टाकले बाबत माननीय सहाय्यक कार्यकारी अभियंता पुर्णा व माननीय सहाय्यक अभियंता शहर शाखा पूर्णा यांना सामूहिक निवेदन भेटून प्रत्यक्षात दिनांक 28 जुलै 2020 रोजी देण्यात आले
या निवेदनावर शाहीर गौतम कांबळे, कैलास खरे, बी.बी. लोखंडे, धम्मरत्न कांबळे,चंद्रकांत कुरवाडे, त्रिंबक गोविंद कांबळे, मनोज खंडागळे, नारायण खरे, लहू प्रधान, गौतम साळवे, संजय गवळी, भारत भगत, विलास साळवे, सुभाष खंदारे, अशोक साबणे, राहुल साळवे, संजय राजभोज, इत्यादींच्या सह्या आहेत.
COMMENTS