शांती निकेतन आंबुलगा (बु) विद्यालयाची एस.एस.सी परिक्षेत यशाची परंपरा कायम.....


 


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील विश्व विकास शिक्षण प्रसारक मंडळ आंबुलगा (बु ) येथील शांती निकेतन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली .शाळेचा यंदाचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.४३ % लागला आहे .एकूण ३९ विद्यार्थ्यां पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८ विध्यार्थी विशेष प्राविण्या सह उत्तीर्ण झाले आहेत तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पुजा गोविंद आकुलवाड ८९ .८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे .तसेच भायेगावे वैष्णवी संभाजी ८४ टक्के गुण मिळवुन विद्यालयात द्वितीय आली आहे , यसगे उमा ८३.६० टक्के गुण मिळवुन विद्यालयात तृतिय आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष - ईरन्ना मामिलवाड ,उपाध्यक्ष- गिरीदास पन्नमवाड , सचिव - गंगाधरराव कल्याणपाड , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधाकरराव मामीलवाड , सौ .रामोड मँडम , सुधाकर नारवाड सर , नागनाथ लगडे सर , आंधळे सर ,मारोती कांबळे सर ,सुभाष गुरूजी अंबुलगेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व आभिनंदन केले ....


टिप्पण्या