तालुक्यातील गुरुकुल विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, ग्रीन फिल्ड नॅशनल स्कुल, विझडम डिजिकॉन्सप स्कुल आणि महात्मा फुले इंग्लिश स्कुल या पाच शाळांचा 100 टक्के निकाल
धर्माबाद - (अहमद लड्डा) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल काल बुधवारी (ता. 29) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आले. दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर झाले. भूगोल व अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली. उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैमध्ये जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने यापूर्वी सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल काल दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आले. या परीक्षेत धर्माबाद तालुक्याचा निकाल 91 टक्के लागला आहे.
तालुक्यात एकूण 16 विद्यालयातून 1178 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1072 विद्यार्थी उत्तीर्ण झाली त्याची टक्केवारी 91.00 अशी आहे.
धर्माबाद येथील जिल्हा परिषद प्रशालेतील 31 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 87.09 अशी आहे. हुतात्मा पानसरे हायस्कुलमध्ये 455 पैकी 398 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 87.47 अशी आहे. उर्दू हायस्कुलमधील 90 पैकी 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 95.55 अशी आहे. जिजामाता कन्या शाळेतील 89 पैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 86.51 अशी आहे. इंदिरा गांधी हायस्कुलमधील 68 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 98.52 अशी आहे. गुरुकुल विद्यालयातील 84 पैकी 84 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 100 टक्के अशी आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 30 पैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 100 टक्के अशी आहे. ग्रीन फिल्ड नॅशनल स्कुलमधील 8 पैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 100 टक्के अशी आहे. विझडम डिजिकॉन्सप स्कुलमधील 14 पैकी 14 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 100 टक्के अशी आहे. महात्मा फुले इंग्लिश स्कुलमधील 21 पैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 100 टक्के अशी आहे.
जारीकोट येथील जिल्हा परिषद अनुदानित हायस्कुलमधील 37 पैकी 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 86.48 अशी आहे. करखेली येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील 33 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 87.87 अशी आहे. गौतमी विद्यालयातील 36 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 91.66 अशी आहे. येताळा येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील 31 पैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 83.87 अशी आहे. कारेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील 105 पैकी 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 94.28 अशी आहे. पाटोदा बु. येथील के. एम. पाटील विद्यालयातील 46 पैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी 89.13 अशी आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
COMMENTS