व्हीपीके पतसंस्थेच्या २४ व्या उद्घाटन सोहळा संपन्न; सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक समृद्धीचा कवळे गुरुजींचा संकल्प

नरेंद्र येरावार. कौठा नांदेड नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, दूध उत्पा...


नरेंद्र येरावार. कौठा नांदेड

नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, दूध उत्पादक, ऊस उत्पादक तसेच महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या व्हीपीके पतसंस्थेच्या २४ व्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा कौठा, तालुका कंधार येथे मोठ्या उत्साहात पार पडला. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

लोककल्याणकारी शेतकरी नेते तथा व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनातून व्हीपीके पतसंस्थेने नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पतसंस्थेची शाखा स्थापन करून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व्यवहारांच्या सुविधा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देण्याचा संकल्प गुरुजींनी केला आहे. त्याच संकल्पाच्या दिशेने वाटचाल करत २४ व्या शाखेचा शुभारंभ झाला.

व्हीपीके पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावणारे एक विश्वासाचे व्यासपीठ बनत आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून असंख्य कुटुंबांना स्वावलंबी होण्याची दिशा मिळाली आहे.

कौठा व परिसरातील नागरिकांसाठी ही शाखा म्हणजे आर्थिक प्रगतीची एक नवी संधी ठरणार आहे. परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक, दूध उत्पादक, ऊस उत्पादक शेतकरी यांना त्यांच्या गरजेनुसार विविध आर्थिक योजना व पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध होणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्हीपीके पतसंस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.

यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कवळे गुरुजी आपण करत असलेले कार्य हे केवळ संस्थेच्या विस्तारापुरते मर्यादित नसून अनेक सर्वसामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे आहे. आपल्या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ मिळेल. या भागातील शेतकरी संपन्न आणि समृद्ध व्हावा, व्हीपीके पतसंस्थेने उत्तरोत्तर प्रगती करावी आणि भविष्यात संस्थेचा नावलौकिक अधिक वाढावा अशी माझी इच्छा असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर बोलून दाखवले.

ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणणे, आर्थिक मदतीच्या माध्यमातून रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करणे आणि शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावणे, हा व्हीपीके पतसंस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशाला बळ देण्यासाठी कवळे गुरुजी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

जनतेचा वाढता विश्वास, नागरिकांचे आशीर्वाद आणि सहकार क्षेत्रातील सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळे व्हीपीके पतसंस्थेची यशस्वी वाटचाल अधिक गतिमान होत आहे. कौठा येथील २४ व्या शाखेच्या उद्घाटनामुळे परिसरातील आर्थिक आणि व्यावसायिक विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही संस्थेचा विस्तार करण्याचा कवळे गुरुजींचा मानस आहे.यावेळी उपस्थित शिवानंद हैबतपुररे, ब्रह्मानंद महाराज तेलूर, बाबुराव देशमुख, एसआरके कारखान्याचे चेअरमन आरडी कवळे साहेब, संजय देशमुख,शिवकुमार देशमुख, अर्चनाताई देशमुख, शंकरराव नाईक, बाबुराव बसवते, दत्तात्रय घोरबांड, नीलकंठ ताकबीडकर,शिवराज पाटील मसलगेकर,प्रदीप पाटील नंदनवनकर, संभाजी देशमुख, शिवशाम देशमुख,रामदास कापसे, प्रतापराव देशमुख,बाबुराव बसवते,पंडितराव येरावार, बालाजी पाटील लाडका, हनुमंत पाटील कळकेकर, बालासाहेब पाटील शिंदे, शंकरराव जाधव,बबलू शेख बारूळकर,पप्पू देशमुख, प्रभाकर पांडे, शाहरुख पठाण यांच्यासह पतसंस्थेचे सचिव नागनाथ पांचाळ, जनरल मॅनेजर नामदेवराव इंगोले, मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव शिंदे, वसुली अधिकारी खेडकर, कौठा शाखेचे बँक मॅनेजर गणेश गोरडवार यांच्यासह पतसंस्थेचे सर्व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते 

सहकारातून समृद्धी, आर्थिक सहकार्यातून स्वावलंबन आणि उद्योगातून रोजगारनिर्मिती**, या त्रिसूत्रीच्या माध्यमातून व्हीपीके उद्योग समूह आणि व्हीपीके पतसंस्था ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.....

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group