सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शासन उचलणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड: शेतकऱ्यांनी कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या करू नये, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या कुटुंबांना धीर देण्याच...
नांदेड: शेतकऱ्यांनी कर्जाच्या तगाद्यामुळे आत्महत्या करू नये, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या कुटुंबांना धीर देण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही शासन उचलणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका आणि सावकरांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वाडी बुद्रुक येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व घोषणा: वाडी बुद्रुक येथे १ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फायनान्स कंपन्यांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेकडो कुटुंबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन पूर्ण मदत करेल, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले. हदगाव येथे आ. बाबुराव कदम यांनी १०० मुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे, त्याच धर्तीवर शिवसेनेच्या आमदार व खासदारानी शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाचा खर्च उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सिंचन व विकासाला प्राधान्य: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढवणे आवश्यक असून, त्यासाठी अकरा जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. १४ हजार ८०० कोटी रुपयांच्या पाणी योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५५० कोटी रुपयांची मदत केली होती, असे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी मतदारसंघातील विकासाकामांसाठी निधीची चिंता करू नये, विकासकामे करा, असे निर्देश त्यांनी दिले. आ. बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वाडी बुद्रुक येथे एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी केली असता, त्यावर तात्काळ प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून गावात बसस्थानक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


विरोधकांवर टीका व मान्यवरांची उपस्थिती: उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्‌घटनावरून त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. रुग्णालयाचे उद्‌घाटन काही जणांनी अंधारात केले, मग दिवसाढवळ्या उद्‌घाटन का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद पाटील बोढारकर, आ. बाबुराव कदम, आ. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील, आरोग्य आयुक्त संजय काटकर, जिल्हाधिकारी राहुल कार्डिले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाम रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सिव्हील सर्जन डॉ. पेरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख बारसेसह पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाडीच्या रुग्णालयासमोर शनिवारी आंदोलन केलेल्या उवाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी ताब्यात घेऊन कारवाई केली.
ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजित सर्व कार्यक्रम आटोपून ते मुंबईकडे रवाना झाल्यानंतर सायंकाळी उशिरा या सर्व पदाधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group