नरेंद्र येरावार उमरी मराठवाड्यात प्रथमच शिर्डीच्या श्री साईबाबांच्या पवित्र चरण पादुका उमरी व संतकवी दासगणू महाराजांच्या पदस्पर्शाने पाव...
नरेंद्र येरावार
उमरी
मराठवाड्यात प्रथमच शिर्डीच्या श्री साईबाबांच्या पवित्र चरण पादुका उमरी व संतकवी दासगणू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गोरठा नगरीत दाखल झाल्या असून या पादुकांचे हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत भव्य-दिव्य स्वागत करण्यात आले.
संतकवी दासगणू महाराज यांनी साईबाबांचे चरित्र ग्रंथ लिहिले असून दासगणू महाराज हे साईबाबांचे परम शिष्य होते. त्यांच्या भूमीत आज प्रत्यक्ष गुरूंच्या पादुका आल्याने साई भक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता. साई पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
माञ अगदी शिस्तीत व नियोजनबद्ध सर्व कार्यक्रम पार पडले.
यावेळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत टाळ-मृदंगाचा गजर, भजनी मंडळे, लेझीम पथक, बँड पथक, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, साधू-संतांची वेशभूषा केलेले वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण उमरी व गोरठा नगरी 'ओम साई राम' च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.
शिर्डीहून आलेल्या साई पादुका रथाचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. पादुकांवर पुष्पवृष्टी करून भाविकांनी दर्शन घेतले. अनेक भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
शिर्डीचे साईबाबा आणि संतकवी दासगणू महाराज यांचे गुरु-शिष्याचे अतूट नाते होते. दासगणू महाराजांनी साई सच्चरित्रासह अनेक ग्रंथांतून साईबाबांच्या लीला जगापुढे आणल्या. त्यामुळे ज्या भूमीत दासगणू महाराजांनी वास्तव्य केले, त्या गोरठ्यात साई पादुका येणे हा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण असल्याचे अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
या स्वागत सोहळ्यासाठी उमरी व गोरठ्यातील सर्व साई भक्त मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ व युवकांनी मोठे परिश्रम घेतले.
साईबाबांच्या पालखी सोबत शिर्डी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे, कामगार अधिकारी शरद डोके, संरक्षण अधिकारी संतोष डेंबरे, सुरक्षा निरीक्षक अरुण वाबळे यांच्यासह शिर्डी साईबाबा संस्थानचे पुजारी, कर्मचारी, सेवक, सुरक्षा रक्षक आदींची उपस्थिती होती.
हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरठा येथील सर्वच गावकरी, साई भक्तांनी परिश्रम घेतले हे मात्र विशेष. भव्य शोभायाञा, पादुकांची
आरती, दर्शन, मंत्र पुष्पांजली, दिवसभर महाप्रसाद यामुळे संपूर्ण गोरठा गाव शिर्डी मय झाले होते.....


COMMENTS