नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे नांदेड (अवैध...
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहेनांदेड (अवैध वाळू कारवाई): नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळगाव निमजी शिवारात नदीपात्रातून इंजिन बोट व फायबर बोटीच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध वाळू उपशावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत हायवा, इंजिन बोट, फायबर बोट आणि ४ तराफ्यांसह तब्बल ८६,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर (जुगार कारवाई): लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून ११ जुगारहींविरुद्ध कारवाई करण्यात आली. यादरम्यान ३५,९०० रुपयांची रोकड, ११ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि ५ मोटार सायकलींसह एकूण १८,५५,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ११ जणांवर कारवाई करत पोलिसांनी १,०५,२५,९०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
नागरिकांना आवाहन: अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाकडून ९१ ५० १०० १०० हा 'खबर' हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला असून, नागरिकांनी यावर माहिती देण्याचे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

.jpeg)
COMMENTS