नरेंद्र येरावार पुणे येथील राष्ट्रभक्ती परिवार, ग्रेट पिपल सोशल फाउंडेशन आणि राष्ट्र भूषण न्यूज यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'आदर्श ...
नरेंद्र येरावार
पुणे येथील राष्ट्रभक्ती परिवार, ग्रेट पिपल सोशल फाउंडेशन आणि राष्ट्र भूषण न्यूज यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'आदर्श राष्ट्र भूषण राष्ट्रीय पुरस्कार' जिंतूरचे सुपुत्र मा. श्री. प्रदीप सोपानराव कोकडवार यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला आहे.
सर्वसमावेशक सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या मंगल सोहळ्यात सौ. भारती तुपे, सौ. प्रियांका आवनावे आणि श्री. सुनील गोरे यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रदीप कोकडवार हे सध्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा - राज्य संघटन प्रमुख म्हणून कार्यरत असून, जिंतूरला रेल्वे आलीच पाहिजे या मोहिमेचे संयोजक देखील आहेत. त्यांच्या या गौरवाबद्दल जिंतूरसह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी पुणे येथे पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS