नांदेड,दि.३- येथील जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील ७० पुरुष यांचे उजळणी प्रशिक्षण शिबीर नुकतेच उत्साहात पार...
नांदेड,दि.३- येथील जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील ७० पुरुष यांचे उजळणी प्रशिक्षण शिबीर नुकतेच उत्साहात पार पडले.
सदर शिबिर केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. होमगार्ड यांच्या प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची उजळणी या शिबिरात करण्यात आली.त्यांना मानसेवी निदेशक तथा वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, बळवंत अटकोरे यांनी पद कवायत, शस्त्र कवायत,प्रथमोपचार,आपत्ती व्यवस्थापन, पूर विमोचन आदींचे प्रशिक्षण दिले.पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ निदेशक आर.के. कांबळे यांनी जमाव नियंत्रण तसेच कायदा आणि सुव्यवस्था याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
आठ दिवस चाललेल्या या शिबिराचे कर्तव्य अधिकारी म्हणून नांदेड पथकाचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे यांनी नियंत्रकाची जबाबदारी पार पाडली.शिबिर यशस्वीतेसाठी प्रशासिक अधिकारी सौ.वैशाली डवरे,प्रमुख लिपिक अभिजीत देशमुख,कनिष्ठ लिपिक पूजा शिंदे,वाहन चालक हनुमंत देवकत्ते,संगणक चालक सिद्धार्थ पवार यांनी बहुमोल सहकार्य केले.
शिबिरातील सुरक्षिततेची जबाबदारी गार्ड कमांडर पलटन नायक प्रशांत जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली भारत कंधारे,गोविंद चिखलवाड,संतोष चव्हाण यांनी पार पाडली.या शिबिरामध्ये गोविंद काष्टेवाड,दीपक
कळणे,राजेश्वर ढगारे,साईनाथ जाधव,राजेश्वर भुरके,शिवाजी कदम,विश्वंभर मुसळे,पुरुषोत्तम नेवारे,मारोती एडके,प्रदीप रत्नागिरे,दत्तात्रय वारे,नागनाथ चिंचोले,सुनील राजुरे,शेख सोहेल मौलासाब,भानुदास केंद्रे,मारोती पांचाळ,पांडूरंग सोनकांबळे आदींसह ७० पुरुष होमगार्ड सहभागी झाले होते.
COMMENTS