खांबेगाव बसस्थानकावर पतीला टेम्पोखाली चिरडून ठार मारल्याचा आरोप!

केशव पवार लोहा गावातील जागेच्या वादातून निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्याचे पर्यवसान अखेर एका भीषण हत्याकांडात झाले. खांबेगाव येथील रहिवासी अ...

केशव पवार लोहा

गावातील जागेच्या वादातून निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्याचे पर्यवसान अखेर एका भीषण हत्याकांडात झाले. खांबेगाव येथील रहिवासी अरुण भाऊराव कुंटे (वय ५०) यांना पालम-लोहा रोडवरील खांबेगाव बसस्थानकाजवळ भरधाव टेम्पोने जोरदार धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अरुण कुंटे यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, टेम्पोखाली अडकलेल्या अरुण यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाही चालकाने वाहन मागे घेऊन पुन्हा त्यांच्या अंगावर घातल्याचा गंभीर आरोप पत्नी मंगलबाई कुंटे यांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी लोहा पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
जागेच्या वादातून अनेक वर्षांपासून वैमनस्य
लोहा तालुक्यातील खांबेगाव येथील मंगलबाई अरुण कुंटे आणि वच्छलेश्वर केशव हिलाल यांच्या कुटुंबामध्ये गावातील राहत्या जागेच्या कारणावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. सुमारे वर्षभरापूर्वी कुंटे कुटुंबीयांनी वादग्रस्त जागा विकून गावातच दुसरीकडे राहण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांनी विकलेली जागा खरेदी करणारे पंडित रोहीजी कुंटे यांनाही हिलाल कुटुंबीयांकडून त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळी झालेल्या वादातून मारहाण
रविवारी सकाळी सुमारे १०.४५ वाजता नागेश केशव हिलाल, वच्छलेश्वर केशव हिलाल, पल्लवी नागेश हिलाल आणि केशव नागोराव हिलाल हे पंडित कुंटे यांच्या घरासमोर आले. तेथे वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेले अरुण कुंटे यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर अरुण यांनी संबंधितांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
बसस्थानकावर गाठून टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप
तक्रार देण्यासाठी अरुण कुंटे हे पत्नी मंगलबाई यांच्यासोबत पालम-लोहा मार्गावरील खांबेगाव बसस्थानकावर उभे होते. त्याचवेळी वच्छलेश्वर हिलाल यांचा मालवाहू अशोक लेलँड दोस्त टेम्पो (क्रमांक एमएच २६ बीई २४९६) तेथे उभा होता. सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास वच्छलेश्वर हिलाल हा हातात वाहनाची चावी घेऊन तेथे आला. त्याच्या पाठोपाठ त्याचा मोठा भाऊ नागेश हिलालही आला.
नागेश याने वच्छलेश्वरला उद्देशून, 'हा कसा पोलीस स्टेशनला जातो ते पाहू, त्याच्या अंगावर गाडी घाल,' असे चिथावणीखोर उद्गार काढल्याचे मंगलबाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर वच्छलेश्वर याने टेम्पो सुरू करून रस्त्यावर उभ्या असलेल्या अरुण कुंटे यांच्या दिशेने भरधाव वाहन नेले आणि त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अरुण रस्त्यावर पडले आणि टेम्पोखाली अडकले. वाहनाने त्यांना अंदाजे ५० फूट फरफटत नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
गाडी मागे घेऊन पुन्हा अंगावर घातल्याचा आरोप
अरुण कुंटे यांना टेम्पोखालून बाहेर काढण्यासाठी पत्नी मंगलबाई, संगीता कामाजी हाटकर, त्यांचा मुलगा मारोती हाटकर, उषाताई पंडित कुंटे, नागनाथ विनायक हिलाल यांच्यासह गावातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र, यावेळी चालकाने टेम्पो मागे घेऊन पुन्हा अरुण यांच्या अंगावर घातल्याचा गंभीर आरोप आहे. उपस्थित नागरिकांनी वच्छलेश्वर याला वाहनातून खाली ओढले. त्यानंतर मारोती हाटकर याने टेम्पो मागे घेत अरुण यांना बाहेर काढण्यास मदत केली.
दरम्यान, वच्छलेश्वर आणि नागेश हे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून लोह्याच्या दिशेने निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
या घटनेत अरुण कुंटे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते. उपस्थित नागरिकांनी दुसऱ्या टेम्पोमधून त्यांना तातडीने लोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
लोहा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी मयत अरुण कुंटे यांच्या पत्नी मंगलबाई अरुण कुंटे यांच्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये वच्छलेश्वर केशव हिलाल आणि नागेश केशव हिलाल या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गावातील जुन्या जागेच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेने खांबेगाव परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास सुरू आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group