नांदेड दि.
नांदेड टेक्सटाईल मिल सुरू करण्यासाठी पाच नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात पंचशीलनगर येथील नागरिक मोठया सखेने सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
पंचशील नगर येथील बुद्ध विहारात श्याम निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली एन.टी.सी. मिल संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली. ही बैठक दीपक सातोरे यांनी आयोजित केली होती. या बैठकीस एनटीसी मिल संवर्धन समितीचे समन्वयक श्याम निलंगेकर,शकीला मॅडम,कावेरी ढगे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्याम निलंगेकर यांनी सर्व लोकांचा पाठिंबा मिळाल्यास मिल चालू होण्यास वेळ लागणार नाही, नांदेड शहराला पुन्हा वैभव प्राप्त होईल,बेरोजगाराला काम मिळेल,गुन्हेगारी कमी करायची असेल तर उद्योगा शिवाय पर्याय नाही असे मत मांडले
एन टी सी मिल सुरु कारण्याच्या लक्षवेधी आंदोलनासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शकीला मॅडम यांनी केले.a या बैठकीस पंचशील नगर बुद्ध विहार समितीच्या लक्ष्मीबाई नरवाडे, सुमनबाई गोडबोले, अनिल थोरात, देवानंद गोडबोले, लक्ष्मण ससाने, चंद्रमणी वाढवे, इंदर जाधव, केशव धोंगडे, दत्ता बनसोडे, चंद्रकांत सावंत, दीपक जमदाडे, प्रीतम सातोरे, रवी हटकर, अतुल गोडबोले, पापोश भालेराव, आकाश थिटे, रोहित लोणे, यश सूर्यवंशी, कुशल धुतमल, सतीश हाटकर, अविनाश सावळे, ओम कोकरे, विशाल सातोरे, सुरज कोकरे, आदी महिला व युवक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
बैठकीच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सातोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल थोरात यांनी केले.

COMMENTS