डॉ. सान्वी जेठवाणी यांना प्रतिष्ठेचा ‘रेक्स कर्मवीर चक्र पुरस्कार – ब्लू मेडल’ जाहीर; तृतीयपंथी हक्क आणि सामाजिक समतेच्या कार्याचा गौरव

नांदेड : तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि LGBTQIA+ समुदायाच्या सन्मान व समावेशनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महाराष...

नांदेड : तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि LGBTQIA+ समुदायाच्या सन्मान व समावेशनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांना प्रतिष्ठेचा ‘Rex Karmaveer Chakra Award – Blue Medal’ प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. Color Positive Foundation आणि Rex Karmaveer Global Fellowship यांच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
डॉ. सान्वी जेठवाणी या गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथी समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींना समाजात समान संधी, सन्मान, प्रतिष्ठा आणि मूलभूत अधिकार मिळावेत, यासाठी त्या सातत्याने शासनस्तरावर तसेच सामाजिक स्तरावर आवाज उठवत आहेत.
महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा म्हणून त्या तृतीयपंथी समुदायाच्या विविध प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात तृतीयपंथी व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
पुणे येथील प्राइड वॉकसह विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सहभाग आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून केलेली जनजागृती ही अधिक समावेशक आणि संवेदनशील समाजनिर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले ठरली आहेत.
रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप आणि रेक्स कर्मवीर चक्र पुरस्कार हे सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आणि आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणारे व्यासपीठ आहे.
या पुरस्कारामुळे डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या सामाजिक कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, तृतीयपंथी समुदायासाठी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींना यामुळे प्रेरणा मिळणार आहे.
“सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा नसून, समान हक्क, स्वाभिमान आणि अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या संपूर्ण तृतीयपंथी समुदायाचा आहे. हा पुरस्कार मला समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, सन्मान आणि समानतेचा विचार पोहोचविण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे,” अशी भावना डॉ. सान्वी जेठवाणी यांनी व्यक्त केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group