अगोदर जनतेच्या आरोग्याचा प्रश्न मिटवा, नंतर विकासाच्या भोंगळ गप्पा करा - शिवसेना (उबाठा) गटाचे स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या प्रत्येक ठिकाणी विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आह...
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या प्रत्येक ठिकाणी विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? याचा कोणीही विचार करत नाही, हे दुर्दैव आहे.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयाला जे 200 खाटाचे आहे, त्याला 500 खाटाचे करा. अशी मागणी लोकप्रतिनिधी करत आहेत, मात्र दुर्दैवाने त्यांनी कधीच या रुग्णालयामध्ये काय हाल आहेत? हे पाहिलेले नाही. कारण या ठिकाणी एकही सुविधा नाही. उदगीरचे हे शासकीय रुग्णालय केवळ रेफरिंग रुग्णालय झाले आहे. याची कोण दखल घ्यावी हा प्रश्न आहे?
उदगीर येथील या जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाचे असलेल्या सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन यापैकी अनेक अधिकारी हे सतत गैरहजर राहतात. या संदर्भात तक्रारी करूनही काहीच होत नाही. शिवाय ते गैरहजर राहणारे आणि मुख्यालयात न राहणारे अधिकारी बिनधास्तपणे बोगस घरभाडे तयार करून घर भाडे घेतात. या संदर्भामध्ये प्रसिद्धी माध्यमांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी चौकशीची मागणी केल्यानंतर आत्ता सूत्र हलू लागली आहेत. मात्र या रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी आणि बिल्डिंग उभा करण्यासाठी गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना या रुग्णालयात बंद असलेल्या सुविधांच्या संदर्भामध्ये कधी माहिती मिळेल हा प्रश्न आहे?
सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः दलित, मुस्लिम, ओबीसी समाजाच्या रुग्णांसाठी शासकीय रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी आय सी यु, एन आय सी यु हे सतत बंद राहत असल्याने तसेच, रोज स्वच्छता या रुग्णालयात होत नसल्याने, हे रुग्णालय अस्वच्छतेचे माहेरघर बनले आहे. या बाबतीमध्ये संबंधितांना विचारणी केली असता स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या 50% भरतीचा अभाव असल्याचे सांगितले गेले. इतकेच नाही तर या रुग्णालयामध्ये अनेक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, या संदर्भातील तक्रारी होत असताना देखील त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे वैतागून लोकांनी आवाज उठवल्यानंतर, तक्रार दाखल केल्यानंतर जे चित्र समोर आले, ते अत्यंत चिंताजनक आहे.
हे लोकप्रतिनिधींनी विचारात घ्यावे, आणि यासंदर्भामध्ये उपचार काय करता येतो? यासंदर्भामध्ये लोकप्रतिनिधींनी कामगिरी करावी. असा विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी केला आहे.
केवळ गुत्तेदार पोसण्यासाठी मोठमोठ्या इमारतीची मंजुरी आणून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून, त्या गुत्तेदारांचे चांगभले म्हणण्यात उदगीर विधानसभा मतदारसंघ भाऊ चर्चित आहे. मात्र दुर्दैवाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिलेल्या वाढवणा येतील दवाखान्याला कोट्यावधी रुपयांचा खर्च करून सुसज्ज अशी इमारत म्हणता येईल, अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाची का होत नाही परंतु इमारत बांधली गेली. मात्र गेल्या दोन वर्षापासून या इमारतीला थडग्यासारखे लोक पाहत आहेत. प्रत्यक्ष या इमारतीचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी कधी होईल? रुग्णालय म्हटल्यानंतर रुग्णाला फायदा व्हावा, ही रास्ता अपेक्षा आहे. मात्र वाढवणा परिसरातील पंधरा ते वीस गावांच्या हिताचा विचार करून हा जो प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 14 कोटी रुपये खर्चून एवढी मोठी इमारत उभा केली आहे. मात्र ही इमारत धुळखात पडून आहे. दुसरीकडे परिसरातील रुग्णांना वाढवणा गावातील स्थलांतरित करण्यात आलेल्या उपकेंद्रातूनच आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. गंमत म्हणजे हे स्थलांतर देशी दारूच्या दुकानासमोर आणि बियर बार व परमिट रूमच्या जवळ असल्याने महिला आणि मुलाबाळांना या ठिकाणी जाणे नकोसे झाले आहे. त्यामुळे इमारत तयार, पदांना मंजुरी मग ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यास विलंब का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास कित्येक वर्षाच्या लढ्यानंतर शासनाने चार वर्षांपूर्वीच मान्यता दिली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पाडून त्या जागेवर कोट्यावधी रुपये खर्चून भव्य दिव्य अशा पद्धतीची इमारत उभा राहिली. मात्र बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष उलटली तरीही अजून त्या रुग्णालयाला मुहूर्त सापडला नाही?
या बांधकामासाठी खर्च झालेला निधी हा सर्वसामान्य माणसाच्या करातून खर्च झालेला आहे. हा निधी मी आणला, तू आणला असा श्रेय वादाचा विषय जरी असला तरीही, हा प्रत्यक्ष कुण्या लोकप्रतिनिधीच्या घरातून खर्च झालेला नाही ! तो शासनाने खर्च केलेला आहे. मात्र इतके दिवस झाले इतका खर्च होऊन देखील या भव्यदिव्य इमारतीचा फायदा रुग्णांना होत नाही, हे अत्यंत दुर्दैव आहे.
वाढवना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मागच्या तीन वर्षापासून गावातील दारूच्या दुकानासमोर सुरू आहे. इमारतीची डाग दुजी करून येथे रुग्णांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे 200 ते 250 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असतात. मात्र आता मोठ्या प्रमाणात आपल्या गावात दवाखाना झाला म्हणून समाधान मानणाऱ्या नव्या पिढीला हे विकासाचे थडगे पाहून नाराजी वाटू लागली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 26 पदाच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्मिती अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार आणि वाहनचालक इत्यादींचा समावेश आहे. असे असले तरीही अद्याप या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधीक्षकच रुजू न झाल्याने पुढील कामगिरी काहीच होऊ शकली नाही.
आरोग्य विभागाच्या नऊ सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये उदगीरच्या शासकीय सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती सोनवणे यांची वाढवणा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानंतर देखील त्यांना उदगीर येथून कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या अद्याप वाढवना येथे रुजू झालेल्या नाहीत. अशाच पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे आणि निष्क्रिय व्यवस्थेमुळे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी करत असल्याने रुग्णांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत आहे. असा गंभीर आरोप देखील शिवसेनेचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी केला आहे. या परिस्थितीचा विचार करून या भागातील नागरिकांचे होत असलेले हाल याचे गांभीर्य शासनाने विचारात घ्यावे. आणि हे रुग्णालय तात्काळ सुरू करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख जाधव यांनी केली आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जर निकाली निघत नसतील किंवा शिवसेनेच्या मागणीचा विचार शासन दरबारी होत नसेल तर नाईलाज म्हणून शिवसेनेला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group