लोहा प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील किवळा येथील गणपतराव मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेशराव घोरबांड हे शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ ३३ वर्ष सेवा बजावुन हजारो गुणवंत विद्यार्थी निर्माण करुन दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्त विद्यालयाच्या वतीने सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गणपतराव मोरे विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी , मित्रमंडळी यांनी त्यांचा सहपत्नीक शाल पुष्पहार घालून कपडेरूपी भेट देऊन भव्य सत्कार केला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, लोहा पोलिस स्टेशनचे अधिकारी सदाशिव जामकर, संतोष पवार,राजु लमदाडे, सुर्यवंशी सर ,सौ. लताबाई गणेशराव घोरबांड, सौ. संगिता बळवंत घोरबांड, यांच्यासह गणपतराव मोरे विद्यालय किवळाचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी गावकरी मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुख्याध्यापक गणेशराव घोरबांड यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य करीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात ही त्यांनी योगदान दिले. ते १० वर्ष कलबंर चे सरपंच, कलंबर सहकारी कारखान्याचे संचालक, १२ वर्ष शिवसेनेचे तालुकाप्रमुख,१२ वर्ष काँग्रेस पक्षात कार्यरत तसेच त्यांनी तीन वेळेस कलबंर जि.प. सर्कल मधुन निवडणूक लढविली आशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सेवापुर्ती सोहळ्यास मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS