नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
नरेंद्र येरावार
उमरी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झाले.
दरम्यान केदारनाथ येथील जगद्गुरु केदारेश्वर महाराज यांचे शर्मा महाराज यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. हा संत भेटीचा योग लाभला. या प्रसंगी जगद्गुरु केदारेश्वर महाराज यांनी केदारनाथ येथे परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा समाधान महाराज शर्मा यांनी लगेच होकार देऊन केदारनाथ येथे कथा करणार असे सांगितले.
यावेळी विरुपाक्ष महाराज मुखेडकर, हभप संतोष महाराज शर्मा, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, नरेंद्र येरावार, मनोज सावकार आरगुलवार नायगावकर, कैलास कवटीकवार, पांडुरंग कोत्तावार आदी उपस्थित होते
..........

COMMENTS