नरेंद्र येरावार उमरी
उमरी तालुक्यातील मौजे धानोरा येथील शेतकरी आनंदराव डवरे यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे डवरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
आपल्या भागातील शेतकरी बांधवावर आलेले हे दुःखद संकट समजताच व्हीपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी धानोरा येथे डवरे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आर्थिक मदत करून आधार देण्याचे काम केले.
शेतकरी बांधवांवर कोणतेही संकट आले, त्याची माहिती मिळताच तत्परतेने त्यांच्या घरी जाऊन भेट देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य ती मदत करणे, ही कवळे गुरुजींची सामाजिक बांधिलकी सातत्याने दिसून येते.
यंदा एकीकडे शेतकरी मोठ्या दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असताना, दुसरीकडे आनंदराव डवरे यांच्या दुर्दैवी निधनाने कुटुंबावर मोठे दुःख ओढवले आहे. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ डवरे कुटुंबीयांना मिळावे आणि दिवंगत आनंदराव डवरे यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी गावातील अनिल रावसाहेब सर्जे, आनंदराव पाटील सलगरे,मुंगल पाटील, दिगंबरराव जगताप, मिल्ट्रीमेन, वसंतराव जाधव, उमरी सिटी ब्रँच चे मॅनेजर विश्वभर जोगदंड, हरि यलामगोंडे, साई जगताप यांच्यासह ग्रामस्थ व कुटुंबीय उपस्थित होते.

COMMENTS