नायगाव प्रतिनिधी दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा पाऊस खूप कमी झाला असून ऊसाची वाढ झाली नाही त्यामुळे एकरी १०-१५ टन उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. उसाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत उसामध्ये वाढ होत नाही. म्हणून ऊस उत्पादनामध्ये घट होऊन शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची गडबड करू नये असे जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे डॉक्टर भगवान मनुरकर यांनी केले आहे.
ऊसाचे क्षेत्र पण घटले असून कारखानदारांनी ऊस गाळप क्षमत्ता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.नांदेड जिल्हाधिकारी यांच्या समक्ष बैठक घेऊन ऊसाला पहिली किंवा एक रकमी ४ हजार रु. मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस तोडणी थांबवावी लागेल.अजून २ महिने ऊस शेतात राहिल्यास हिवाळ्या मध्ये साखर प्रमाण वाढेल आणि त्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ होईल अशी शक्यता आहे.आज कारखानदार ऊस दर जाहीर न करता ऊस तोडणी सुरू करत आहेत हे सर्वस्वी चुकीचे आहे.मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे या महाभयंकर कोरड्या दुष्काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.कोणताच कारखानदार आपला नाही ते स्वतःचे हित जोपासत आहेत.ऊस दर वाढीची आमची मागणी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरू आहे. नोव्हेंबर व डिसेंबर शिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोडणी करू देऊ नये असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आला आहे .

COMMENTS