नोटरी असोसिएशनची कार्यशाळा उत्साहात संपन्न
नांदेड/ प्रतिनीधी - शासकीय व अशासकीय व्यवहारामध्ये फसवणूक टाळण्यासाठी व दस्तावेज अधिकृत करण्यासाठी प्राधान्याने नोंदणीकृत नोटरी करावी असे आवाहन महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ ॲड. संतोष जोंधळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशन नांदेड शाखेच्या वतीने वजीराबाद येथील आयुर्वेदिक कॉलेजसमोरील दुर्वांकुर हॉटेल येथे नोटरी व वकीलांची विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ॲड. संतोष जोंधळे मार्गदर्शन करीत होते .या कार्यशाळेचे उद्घाटन असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष स. सिकंदर अली यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ॲड. हरीश गोकुळदास प्रताप व सांगली येथील ॲड. अविनाश रामचंद्र कुंडाळकर यांनी उपस्थित वकिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. यदुपत अर्धापूरकर, माजी बार कौन्सिल मेंबर ॲड. अण्णाराव पाटील आणि विदर्भ प्रमुख नोटरी असोसिएशनचे ॲड. अनील एस. झनक उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रक म्हणून ॲड. गणेश किर्तने, ॲड डी. के. हांडे व ॲड. अमरकिसिंग वासरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप माधवराव गंगातीर यांच्या नेतृत्वाखाली ॲड. संतोष जोंधळे , ॲड. जगजीवन भेदे, ॲड. शेख शफिओद्दीन, ॲड. टि. जी. बिराजदार, ॲड. सॅमसन करकरे व ॲड. ज्योती सूर्यवंशी ॲड. जगन दर्शने यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

COMMENTS