स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलातील तसेच विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांतील पीएच.डी. संशोधकांसाठी पीएच.डी. कोर्सवर्क ऑक्टोबर २०२६ परीक्षेचे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात Pen & Paper पद्धतीने घेण्यात येणार आहे.
Online NPTEL-SWAYAM पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित संशोधन केंद्रात विहित मुदतीत परीक्षा आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी रु. ३४०/- परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा आवेदनपत्र ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित विद्यापीठ संकुल अथवा संशोधन केंद्र येथे ऑनलाइन शुल्कासह सादर करावे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध QR कोडद्वारे ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १६ ऑक्टोबर २०२६ आहे. तसेच संबंधित संकुले व संशोधन केंद्रांनी परीक्षा आवेदनपत्रे आणि परीक्षा शुल्क १६ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षा विभागाकडे सादर करावीत.
पीएच.डी. कोर्सवर्क परीक्षेसंदर्भातील सर्व संबंधित विद्यार्थी, संशोधकांनी वेळेच्या आत आवेदणपत्र सादर करावीत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले आहे.

COMMENTS