शेतकऱ्यांचा डीवायएसपी व पो.नि. यांनी केला सत्कार लोहा प्रतिनिधी आजकाल या धावपळीच्या काळात व कलीयुगात आजुनही माणुसकी जीवंत आहे . यांचे उदाहरण...
शेतकऱ्यांचा डीवायएसपी व पो.नि. यांनी केला सत्कार
लोहा प्रतिनिधी
आजकाल या धावपळीच्या काळात व कलीयुगात आजुनही माणुसकी जीवंत आहे . यांचे उदाहरण लोहा येथील बस स्थानकातील पहायला मिळाले फरकंडा ता .पालम जि.परभणी येथील महिला नामे गिता वैजेनाथ पौळ या महिलेची दीड तोळा सोन्याची एकदानी किंमत अंदाजे २ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने व रोख दीड हजार रुपये त्याच सोबत आधार कार्ड असलेले पर्स खांबेगाव ता.लोहा ,जि.नांदेड येथील शेतकरी मधुकर उमाजी हिलाल व त्यांचे मित्र नारायण कोचर रा. ढगे पिंपळगाव या.लोहा यांना सापडली असता त्यांनी लोहा बसस्थानकातील मेस्कोचे सुरक्षा रक्षक शेख लतीफ व यांना सांगितले . तेव्हा सदरील महिलेना तिची ओळख पटवून देऊन दागिने रोख रक्कम परत करण्यासाठी लोहा पोलिस स्टेशन येथे आणुन डीवाय एसपी जुमडे व पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांच्या हस्ते परत केले.
यावेळी मधुकर हिलाल यांचा सत्कार डीवायएसपी सुशिल जुमडे व पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी मिडिया पोलिस सोशल क्लब चे तालुकाध्यक्ष विलास सावळे, लोहा बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष अॅड मोटरवार उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्रिया देताना लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणाले की अजुन ही माणुसकी जीवंत आहे मी मधुकर हिलाल यांचे अभिनंदन करतो त्यांनी सदरील पर्स सापडल्यानंतर परत केली. लोहा शहरात अशी घटना कुठे घडल्यास पोलीसांची संपर्क साधावा व गुन्हा घडण्यापासुन रोखावा असे पो.नि. अरविंद घोडके म्हणाले.

COMMENTS