नांदेड (प्रतिनिधी): उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू व्हावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्य...
नांदेड (प्रतिनिधी): उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू व्हावी या मुख्य मागणीसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. आता या आंदोलनात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारीही सक्रिय उतरल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.शासनाकडून मागण्यांचा गांभीर्याने विचार होत नसल्याने १७ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर साखळी उपोषण, तर ५ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री, नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे नोटीस देण्यात आली आहे.यावेळी नांदेड जिल्हा न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन. एस. गिरगावकर, सचिव विनोद पाथरकर, तसेच नांदेड जिल्हा सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी संघाचे अध्यक्ष एस. पी. कोटगीरे, कार्याध्यक्ष ए. बी. कोमवाड, सचिव एस. एम. आडसूळ यांच्यासह बहुसंख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS