गोदावरीतीरी इतिहासाचा जागर ; नांदेडमध्ये 'बंदासिंघ बहादूर मिलाप दिन' उत्साहात साजरा

गुरु गोविंदसिंघजी महाराज व बाबा बंदासिंघ बहादूर यांच्या ऐतिहासिक भेटीला उजाळा ; बंदा घाट गुरुद्वारात विविध कार्यक्रम नांदेड : ४ सप्टेंबर  शी...


गुरु गोविंदसिंघजी महाराज व बाबा बंदासिंघ बहादूर यांच्या ऐतिहासिक भेटीला उजाळा ; बंदा घाट गुरुद्वारात विविध कार्यक्रम

नांदेड : ४ सप्टेंबर 

शीख इतिहासातील ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस म्हणून ओळखला जाणारा 'बंदासिंघ बहादूर मिलाप दिन' गुरुवारी (३ सप्टेंबर) नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गोदावरी नदीच्या तीरावरील बंदा घाट गुरुद्वारा येथे विविध धार्मिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


सन १७०८ मध्ये याच दिवशी नांदेड येथे श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. या ऐतिहासिक भेटीच्या स्मरणार्थ दरवर्षी 'मिलाप दिन' साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमासाठी बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांच्या मार्गदर्शनाखाली लुधियाना येथून विशेष जत्था नांदेडमध्ये दाखल झाला होता. जत्थ्याच्या उपस्थितीत बंदा घाट गुरुद्वारात विविध धार्मिक व स्मृतिपर कार्यक्रम पार पडले. बाबा बंदासिंघ बहादूर हे शीख इतिहासातील पराक्रमी योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती म्हणून ओळखले जातात. त्यांचे शौर्य, त्याग आणि संघर्षाचा इतिहास आजही समाजाला प्रेरणा देतो. त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.


या कार्यक्रमास शीख बांधवांसह इतिहासप्रेमी व विविध समाजातील नागरिक उपस्थित होते. पंजाब चे माजी मंत्री सरदार मलकितसिंघ दाखा, सरदार जसवंतसिंघ छापा, अखिल भारतीय कॉंग्रेस चे सचिव तथा पंजाब प्रभारी श्री रवींद्र दळवी, महारष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर, नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे,कॉंग्रेस चे माजी अध्यक्ष श्री राजेश पावडे,कॉंग्रेस चे उपाध्यक्ष श्री बालाजी चव्हाण, कॉंग्रेस चे माजी कार्याधक्ष महेश देशमुख तारोडेकर, डॉ अब्दुल बाकी, सय्यद शेर आली, गोविंद बाबा गौड,गंगाधर सोंडारे, मोहमद अजीज कुरेशी, श्रावण रापंनवाड,नंदीग्राम जागरण चे संपादक श्री प्रल्हाद लोहेकर, सरदार तरलोचन सिंह सफरी,एस. एस. खुराना,हेमराज गोयल,मनजीत सिंह झम्मट,उमराव सिंह छीना,

करनैल सिंह गिल, सरदार हरजितसिंघ खालसा,रणजीत सिंह साहनेवाल, जगजीवन सिंह सफरी,सुशील कुमार शीला, प्रबंधकरू हरजीत सिंह खालसा,तरलोचन सिंह बिलासपुर,बीबी करमजीत कौर छंदड़ा,बीबी सरबजीत कौर मांगट,बीबी सिम्मी कुवात्रा एवं बीबी सोनिया अरोड़ा व बाबा बंदा सिंह बहादुर अंतरराष्ट्रीय फाउंडेशन तसेच नानक साई फाऊंडेशन -संत नामदेव घुमान यात्रेचे प्रमुख कार्यकर्ते यांचा समावेश होता. ऐतिहासिक वारसा आणि गुरु-शिष्य परंपरेच्या स्मृतींना उजाळा देत कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group