लोहा प्रतिनिधी नांदेड -लातुर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोहा बस स्थानकात सुलभ शौचालय असुनसुध्दा अनेक ...
लोहा प्रतिनिधी नांदेड -लातुर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लोहा बस स्थानकात सुलभ शौचालय असुनसुध्दा अनेक पुरुष हे उघड्यावर लघवी करीत असल्यामुळे महिला वर्गातुन तीव्र संतापाची लाट उसळली आहे तेव्हा याकडे लोहा बस स्थानकातील सुरक्षा रक्षक व लोहा पोलीसांनी तात्काळ लक्ष देऊन देऊन लोहा बस स्थानकात उघड्यावर लघवी करणाऱ्या पुरुष मंडळीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातुन व जनतेतून होत आहे. लोहा बस स्थानकात लोहा शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी व नांदेड - लातुर या राष्ट्रीय महामार्गावर आहे येथे दररोज हजारो महिला -पुरुष प्रवास करतात तसेच लोहा बस स्थानकांच्या बाजुला प्रियदर्शनी नगर व इंदिरानगर ला जाणार सिमेंट रस्ता होत असल्याने या रस्त्याने अनेक महिला पुरुष यांची दररोज ये जा करीत आहेत पण लोहा बस स्थानकात अनेक महानग हे बस स्थानकात सुलभ शौचालय असुनसुध्दा अनेक पुरुष हे उघड्यावर लघवी करीत आहेत त्यामुळे लोहा बस स्थानकातील महिला प्रवाशी व प्रियदर्शनी नगर व इंदिरानगर येथील महिला भगिनींना यामुळे नाहक त्रास होत आहे.
काही वर्षांपूर्वी लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम (सिंघम) व पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी लोहा बस स्थानकात व मुख्य रस्त्यावर उघड्यावर लघवी करणाऱ्यावर कठोर कारवाई केली होती.
त्याप्रमाणेच आता लोहा पोलिस स्टेशनचे नुतन पोलिस निरीक्षक घोडके व लोहा बस स्थानकातील सुरक्षा रक्षकांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन लोहा बस स्थानकातील मोकळ्या जागेत उघड्यावर लघवी करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गातुन व जनतेतून होत आहे....

COMMENTS