नांदेड, १९, जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि विविध विभागांच्या सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा स...
नांदेड, १९, जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि विविध विभागांच्या सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आज भोकर तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत हाडोळी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, विविध दाखल्यांचे वितरण, घरकुलांना भेटी, महिला बचत गटांना कर्जाचा धनादेश तसेच विविध शासकीय संस्थांना भेटी देऊन अभियानाला सुरुवात करण्यात आली.
अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे जन्म, मृत्यू व विवाह प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. घरकुलांना भेट देऊन आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. महिला बचत गटाला कर्जाचा धनादेश देण्यात आला. तसेच प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
एकही लाभार्थी शासकीय सेवेपासून वंचित राहू नय, या उद्देशाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले. गरोदर मातांच्या नोंदणीसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांमध्ये प्रभावी समन्वय साधावा. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभापासून कोणतीही माता वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आयुष्मान भारत कार्डची नोंदणी व जनजागृती वाढवावी, शालेय विद्यार्थ्यांची MBU नोंदणी पूर्ण करावी तसेच ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे प्रलंबित दाखले तातडीने वितरित करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
शासकीय यंत्रणा केवळ कार्यालयात न राहता प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. विविध विभागांमध्ये समन्वय साधून सेवा देण्याची प्रक्रिया गतिमान केल्यास सेवा संकल्प अभियान अधिक प्रभावीपणे यशस्वी होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
आरोग्य उपकेंद्रातील गळतीची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी हाडोळी येथील आरोग्य उपकेंद्रासही भेट देऊन पाहणी केली. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये गळती होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदाराला बांधकामातील दोष दुरुस्तीच्या दायित्व कालावधीत गळतीची दुरुस्ती तातडीने करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी भोकर पंचायत समितीचे थगट विकास अधिकारी शेखर देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, उपविभागीय अभियंता शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी चाटलावर, शिक्षण अधिकारी तरवडे, विस्तार अधिकारी गोणशेटवार, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गोवंडे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनिता माधवराव अमृतवाड, उपसरपंच अनुसयाबाई रामराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक दुधारे, विजयादशमी कृष्णुरे, संगीता रामराव भालेराव, दुर्गा हरिदास किनेवाड, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS