महामार्गावरील अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा अल्टीमेटम! ६ सप्टेंबरपर्यंत जागा मोकळी करा; अन्यथा ७ सप्टेंबरला थेट बुलडोझर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग १६१-अ वरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश; अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्य  माहूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-अ ...

राष्ट्रीय महामार्ग १६१-अ वरील अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश; अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्य 

माहूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-अ वरील अनधिकृत अतिक्रमणांवर आता प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कोठारी ते घनोडा या सुमारे ५७.६५० किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रस्त्याच्या हद्दीत (ROW) करण्यात आलेली अतिक्रमणे स्वतःहून हटवून जागा मोकळी करण्यासाठी संबंधितांना ६ सप्टेंबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास ७ सप्टेंबर रोजी संबंधित विभागामार्फत थेट अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्गालगतची बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित करण्यासाठी आणि महामार्गावरील अपघातांना आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या सुओ-मोटो रिट याचिका (सिव्हिल) क्र. ९/२०२५ मधील १३ जुलै २०२६ रोजीच्या आदेशाचा तसेच नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, भोकर यांनी १ सप्टेंबर रोजी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे.
नोटीसनुसार, ६ सप्टेंबरपर्यंत अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण पूर्णपणे हटवून जागा मोकळी करणे बंधनकारक आहे. अन्यथा ७ सप्टेंबरला प्रशासनाकडून नियमानुसार कारवाई करून अतिक्रमणे हटविण्यात येतील. अतिक्रमण हटविण्यासाठी होणारा खर्च तसेच इतर कायदेशीर जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकांचीच राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
कारवाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार माहूर, पोलीस अधीक्षक नांदेड, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महावितरण यांना माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुढील आठवड्यात किनवट शहरात राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे.या संभाव्य कारवाईमुळे महामार्गालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील आठवड्यात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे किनवट शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group