देगलूर प्रतिनिधी मारोती कुडकेवार देगलूर:- बिलोली तालुक्यातील प्रसिद्ध व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुळ येथील काळा मारु...
देगलूर प्रतिनिधी मारोती कुडकेवार
देगलूर:- बिलोली तालुक्यातील प्रसिद्ध व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लघुळ येथील काळा मारुती मंदिरात ३१ ऑगस्ट रोजी भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. देगलूर तालुक्यातील शेळगाव नृसिंह येथील रहिवासी कृष्णापुरे सायलू नागनाथ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक परंपरेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
लघुळ येथील काळा मारुती देवस्थान हे अत्यंत जागृत आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्रद्धास्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. "या काळा मारुतीला मनातून जे काही मागितले, ते नक्कीच पूर्ण होते," अशी गाढ श्रद्धा येथील भक्त आणि नागरिकांमध्ये आहे. याच श्रद्धेपोटी दरवर्षी येथे या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
या भंडाऱ्याच्या निमित्ताने आयोजित महाप्रसादासाठी कृष्णापुरे सायलू नागनाथ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देगलूर आणि बिलोली तालुक्यातील अनेक नातेवाईक, मित्र मंडळी तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेत मारुती रायाचे दर्शन घेतले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात अतिशय भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS