जळकोट, जि.लातूर (दि.१३ सप्टेंबर २०२६)
अर्धी लोकसंख्या महिलांची असल्यामुळे त्यांच्या सहभागाशिवाय लोकशाहीचे प्रतिनिधित्व पूर्ण होऊ शकत नाही महिलांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सत्तेतील सहभागाने लोकशाही समृद्ध होईल. त्याकरिता समाजाने मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस तर्कवादी, बुद्धीवादी, निसर्गवादी आणि विज्ञाननिष्ठ झाल्यानंतरच स्त्री-पुरुष समता प्रस्थापित होऊ शकेल, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख सुप्रसिद्ध वक्ते डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोट येथील 'महिलांचा राजकारणातील सहभाग: अपेक्षा आणि वास्तव' या विषयावरील दि. १२ सप्टेंबर रोजी आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर सत्राचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर लक्षेटे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्यंकट पाटील, डॉ.राजश्री जाधव, डॉ.लक्ष्मण दिघोळे, सूत्रसंचालिका डॉ. अलका सोमवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी सभागृहात प्राचार्य डॉ.बी.टी. लहाने, अभ्यास मंडळ सदस्य डॉ. संजय गायकवाड, डॉ.दयानंद गुडेवार, डॉ. विजय तुंटे, डॉ. महिपाल सुळे, डॉ.संतोष कोल्हे, प्रा. निरंजन पतंगे, विष्णू चौरे, डॉ.बापूराव आंधळे, प्रा.अनिल केंद्रे यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
परिषदेचे उद्घाटन संस्थेचे सचिव मानवेंद्र केंद्रे, उद्घाटक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. के. हरिबाबू, बीजभाषक प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील डॉ.विजय तुंटे, प्राचार्य डॉ.बी.टी. लहाने, डॉ. व्यंकट पाटील, सूत्रसंचालिका डॉ.देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

COMMENTS