-
बिलोली प्रतिनिधी बिलोली शहरातील नवरत्न गल्ली, येथे.दिनांक5/09/2026 रोज शनिवारकोळी गल्ली येथील प्रतिक कांबळे यांनी दहिहाडी फोडून 5000 रुपये बक्षीस मिळविले व गाधीचौक येथील आनंद श्यामराव शिंदे बागेतील पांडुरंग दत्ता मदनुरे यांनी दहिहाडी फोडण्याचा मानमिळवला तरशहरातील अनेक दहिहाडीचा कार्यक्रम यसस्विरित्या पारपडला तर नवरत्न दहीहंडी उत्सव मंडळ च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपाळांसह नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळालीशिवाजी चौक, नवरत्न गल्ली बिलोली, येथे आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे थरांचे प्रमाण -६ थलावणाऱ्या सिद्धेश्वर गोविंदा पथक सगरोळी या पथकाने मानाची दहीहंडी फोडून प्रथम बक्षीस मिळवलेबक्षिसाची रक्कम - 7,777 रुपये.
नवरत्न दहीहंडी गोविंदा पथकाणे मिळवले,द्वितीय बक्षीस - 6,666 रुपये.सकाळ पासूनच परिसरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण होते. दुपारनंतर 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात विविध गोविंदा पथकांनी हजेरी लावली.दहीहंडी उंच चढवून नवरत्न गल्ली येथून श्री कृष्ण मंदिर जुना बसस्टॅण्ड इथपर्यत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्या नंतर दहीहंडी उत्सवास सुरुवात झाली.
अनेक प्रयत्नांनंतर सिद्धेश्वर गोविंदा पथक सगरोळी ने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने 6 थर रचून दहीहंडी यशस्वीरीत्या फोडली आणि उपस्थितांची मने जिंकली. मंडळाच्या वतीने विजेत्या पथकाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.लता गंगाधर शिंदे विद्यमान नगरसेविका व सेवक स्वप्नील खंडेराव खंडेराय यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नवरत्न गल्लीतील सर्व वरिष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष आणि नवरत्न मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या चोख बंदोबस्त हा कार्यक्रम पार पडल
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘जय वाल्मिकी जय वाल्मिकी दहीहंडी उत्सव समिती’चे अभिजीत दादा तुडमे, इंद्रजीत तुडमे प्रशांत अंकुशकर, प्रदीप अंकुश कर,विजय तुडमे, साईबाबा तुडमे, रोशन तुडमे, आदिनाथ तुडमे, संतोष अंकुशकर, अनिल आंबेराव, प्रशांत गादगे, रंजीत भोजराव,विश्वजीत तुडमे,अनिल सनमुखे, धीरज तुडमे, राहुल भोजेराव, प्रीतम मामडे, सतीश बळवंतकर, सुदेश बळवंतकर, शंकर बालके, प्रफुल कल्याणकर, यांच्यासह असंख्य पदाधिकारी, सदस्य तसेच कोळी गल्लीतील नवयुवकांनी परिश्रम घेतले. उत्सवादरम्यान उपस्थित नागरिकांनी समितीच्या आयोजनाचे कौतुक करत पुढील वर्षीही अशाच उत्साहात दहीहंडी साजरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या

COMMENTS