माहूर (प्रतिनीधी)दत्तशिखर येथे नियमित दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसह परिक्रमा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सेवा-सुविधेसाठी दत्तशिख...
माहूर (प्रतिनीधी)दत्तशिखर येथे नियमित दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसह परिक्रमा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सेवा-सुविधेसाठी दत्तशिखरचे महंत डॉ.धनेश्वर भारती महाराज यांनी भाविक भक्तांना सेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. महाराजांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विविध भागांतील अनेक भक्तांनी दत्तशिखर येथे उपस्थित राहून विविध प्रकारची सेवा बजावली.सेवेसाठी आलेल्या भक्तांसाठी कामाचे स्वरूप महत्त्वाचे नव्हते; महंत महाराजांचा आदेश हाच सेवाभावाचा केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने मनोभावे आपली जबाबदारी पार पाडली.याच सेवाभावातून वाई बाजार येथील सेवेकरी पत्रकार कार्तिक बेहेरे, अरुण खराटे, रामराव मोरे व बंडपा गेंटलवार,ओम सोनटके हे दत्तशिखर परिसरात सेवा बजावत होते. परिसरातील कापलेले गवत महाराजांच्या अश्वांसाठी नेऊन घालत असताना त्यांच्या निदर्शनास महाराजांच्या एका अश्वाच्या पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याचे दिसून आले.ही बाब लक्षात येताच पत्रकार कार्तिक बेहेरे यांनी तत्काळ पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. राजगुरू यांनी तत्परतेने दत्तशिखर येथे येत त्या अश्वावर उपचार केले.अश्वाच्या पायावरील जखम गंभीर व संवेदनशील अवस्थेत होती. मात्र, आपली शासकीय सेवा बजावत असतानाही महंत डॉ. धनेश्वर भारती महाराज यांच्या आदेशाला सेवा मानून डॉ. राजगुरू यांनी उपचाराची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या तत्परतेमुळे एका मुक्या जीवाला वेदनेतून दिलासा मिळाला.
या घटनेतून दत्तशिखरावरील सेवाभावाचे एक सुंदर दर्शन घडले. भक्तांची सेवा असो, परिसराची स्वच्छता असो किंवा मुक्या जीवाची काळजी—महाराजांचा आदेश आणि जीवमात्राप्रती करुणा हाच खरा सेवाधर्म असल्याची प्रचिती यानिमित्ताने आली.दत्तशिखरावर सुरू असलेल्या या सेवाकार्यात सहभागी झालेल्या सर्व सेवेकऱ्यांसह डॉ. राजगुरू यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्पर सेवेचे भाविक भक्तांकडून कौतुक होत आहे.

COMMENTS