नांदेड / देगलूर: देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणाने अत्यंत टो...
नांदेड / देगलूर: देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे सार्वजनिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका तरुणाने अत्यंत टोकाचे आणि अनोखे आंदोलन छेडले आहे. गावातील आकाश कोकणे या युवकाने थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडांचे सरण रचून त्यावर झोपून हे आंदोलन सुरू केले आहे.
स्मशानभूमीची मोठी समस्या: निपाणी सावरगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक स्मशानभूमीची जागा उपलब्ध नसल्याने अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.
प्रशासकीय अनास्था: ग्रामस्थ आणि आकाश कोकणे यांनी शासन दरबारी वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष करण्यात आले.
प्रकृती खालावली: आमरण उपोषणादरम्यान ६ दिवसांपासून अन्नत्याग केल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाकडून ठोस निर्णय न आल्याने अखेर सरणावर झोपून आंदोलन तीव्र करण्यात आले.
मागणी: जोपर्यंत स्मशानभूमीसाठी अधिकृत जागा निश्चित करून लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS