हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड...
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने मुला-मुलींसाठी खुल्या ६ कि.मी. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या शुभहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरूंनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात केली.
६ कि.मी. मॅरेथॉनमध्ये मुलांच्या गटात गंगाखेड येथील प्रतीक पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५,००१ रुपये पारितोषिक मिळविले. किनवट येथील प्रणव राठोड यांनी द्वितीय क्रमांक (३,००१ रुपये), माहूर येथील वैभव तरंगे यांनी तृतीय क्रमांक (२,००१ रुपये), तर करण खंडारे यांनी चतुर्थ क्रमांक (१,००१ रुपये) मिळविला.
मुलींच्या गटात लातूर येथील पुष्पा राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळवत ५,००१ रुपये पारितोषिक पटकावले. परभणी येथील प्रमिला बाबर यांनी द्वितीय क्रमांक (३,००१ रुपये), उदगीर येथील वैष्णवी राठोड यांनी तृतीय क्रमांक (२,००१ रुपये), तर नांदेड येथील रूपाली घोडके यांनी चतुर्थ क्रमांक (१,००१ रुपये) मिळविला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आणि डॉ. भीमा केंगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून युवकांमध्ये खेळाची आवड, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश मुंडे, डॉ. दिलीप काळे, डॉ. दत्तात्रय मुंडे, डॉ. खुशाल वाघमारे, डॉ. कुलजित राणा, श्री. संभाजी तोटेवाड, गोविंद पांचाळ, वैभव दमकुंडवार, डॉ. विजय जाधव आणि डॉ. उदगीरकर यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागातील रामा किरकन, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, परमजीतसिंग सिद्धू आणि रतनसिंग पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS