महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणाऱ्या ५४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

नांदेड,दि.३१ ऑगस्ट: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम...
नांदेड,दि.३१ ऑगस्ट: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या औचक तपासणीत कार्यालयीन वेळेत गैरहजर आढळलेल्या तब्बल ५४ कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कार्यालयीन शिस्त व सेवेची गुणवत्ता राखण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी वेळेचे पालन करणे सक्तीचे आहे. ज्यामध्ये वर्ग-३ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. तर वर्ग-४ संवर्गातील कर्मचारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्तव्यावर असताना प्रत्येक कर्मचाऱ्याकडे त्याचे अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच वर्ग-४ संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या राष्ट्रीय गणवेशातच उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रशासकीय कामकाजात गतिशीलता आणण्यासाठी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अभिजित वायकोस यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष 'तपासणी पथक' गठीत करण्यात आले आहे. या पथकाने सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी कार्यालयीन वेळेत महानगरपालिकेच्या विविध विभागांची औचक पाहणी केली. या तपासणी दरम्यान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून एकूण ५४ कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले. कार्यालयीन नियमांचे आणि शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या या सर्व ५४ कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेत प्रशासनाने त्यांना तात्काळ 'कारणे दाखवा' नोटीस जारी केली आहे.

महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या गैरशिस्तीबद्दल आणि नियमांच्या उल्लंघनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "तुमच्यावर शिस्तभंगाची व दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये?" अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत संबंधित कर्मचाऱ्यांनी यावर आपला लेखी खुलासा सादर करावा, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कडक प्रशासकीय व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांच्या सेवेला प्राधान्य: मनपा आयुक्त
महानगरपालिका हे नागरिकांना मूलभूत सेवा देणारे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लेट-लतीफी, गणवेश व ओळखपत्राबाबतचा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासकीय कामात पारदर्शकता, वेळ आणि शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या औचक तपासण्या यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group