नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. निवडक कवी कवयित्रींचे एआय ( कृत्रिम बुद्धिमत्...
नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. निवडक कवी कवयित्रींचे एआय ( कृत्रिम बुद्धिमत्ता) पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नांदेड शहरात पहिले कविसंमेलन भरणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा अनेक क्षेत्रांत शिरकाव झालेला आहे. साहित्य क्षेत्रातही एआय आले असून 'राखीच्या धाग्यातली कविता' या विषयावर राखी पौर्णिमेनिमित्त ३०–४५ मिनिटांचे AI एआय पद्धतीने विशेष कविसंमेलन होणार असल्याचे सप्तरंगी साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष तथा काव्य पौर्णिमा कार्यक्रमाचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे यांनी कळविले आहे.राखी हा केवळ धागा नाही; तो प्रेम, विश्वास, आठवणी आणि आयुष्यभराच्या नात्याची खूण आहे. या नात्याला शब्दांची आणि एआय AI च्या सर्जनशीलतेची जोड देत एक आगळेवेगळे कविसंमेलन होत आहे. यात एआय स्वागतदृश्य व मंगलाचरण, सूत्रसंचालकांचे उद्घाटन, लघु काव्यप्रस्तावना, आठवणींची राखी — भावनिक विशेष सत्र, प्रेक्षकांची चारोळी / एआय AI काव्यउपक्रम, एआय AI काव्यदृश्य व सामूहिक कविता, वैयक्तिक काव्यसादरीकरण, कविता आणि समीक्षा शेवटी समारोप अशा स्वरूपाचे वेळापत्रक विविध वाॅटसप समुहात पाठविले आहे, जास्तीत जास्त कवी कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS