नायगाव (बा.) : नायगाव एज्युकेशन सोसायटी संचलित शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव (बा.) येथील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय से...
नायगाव (बा.) : नायगाव एज्युकेशन सोसायटी संचलित शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव (बा.) येथील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘उद्बोधन वर्ग (Induction Programme)’ दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छाऐवजी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बलभीम जे. वाघमारे होते. यावेळी प्रा. डॉ. श्याम पाटील, प्रा. डॉ. एम. एस. सिद्दिकी, प्रा. डॉ. एस. एस. अंजनीकर तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोविंद राजाराम परडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रंथपाल डॉ. बी. आर. लोकलवार यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध सुविधा, संदर्भग्रंथ, ई-संसाधने, डिजिटल सेवा, ग्रंथालयाचा योग्य वापर तसेच वाचन संस्कृती याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा नियमित वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. मारुती कदम यांनी एनएसएसची उद्दिष्टे, उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य प्रो. डॉ. बलभीम जे. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत वाचन, संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय भालेराव यांनी प्रभावी व ओघवत्या शैलीत करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. आभार प्रदर्शन प्रा. साई गणेश यादव यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS