लोहा : शहराच्या मध्यवर्ती भागात मागील अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना प्रशासनाने ...
लोहा : शहराच्या मध्यवर्ती भागात मागील अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना प्रशासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, लोहा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सन 1980 पासून अनेक वंचित, बौद्ध समाज तसेच इतर मागासवर्गीय कुटुंबातील नागरिक भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. यातील अनेक विक्रेत्यांच्या पुढील पिढ्याही याच व्यवसायावर अवलंबून आहेत.
दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी नगरपरिषद प्रशासनाने भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे स्टॉल हटविले. या कारवाईदरम्यान विक्रेत्यांचे साहित्य, वजनकाटे व भाजीपाला जप्त करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
भाजीपाला विक्रेत्यांना शहराच्या मध्यवर्ती भाजी मंडई परिसरात अथवा योग्य ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच कारवाईपूर्वी विक्रेत्यांना योग्य सूचना व कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या मागणीसंदर्भात प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन भाजीपाला विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS