कंधार : प्रतिनिधी दि.४ जुलै २०२६ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी चा वसा हाती घेऊन ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनाची मशाल हाती घेऊन भारतीय संविधानिक मूल्यांचा प्रचार, वंचित बहुजनांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा आणि युवकांमध्ये सामाजिक जागृती करण्यासाठी त्यांनी आपले कार्य करत आहेत.अशा या युवकाच्या सामाजिक कार्याची दखल घेत रूपेश कांबळे यांना 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार–२०२६' या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवीन नांदेड येथे झालेल्या सोहळ्यात अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आला आहे.सामाजिक कार्य हे केवळ घोषणांपुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजात परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. समाजातील अन्यायाविरोधात भूमिका, शिक्षणाविषयी जनजागृती, संविधान विचारांचा प्रसार, फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतावादी विचारांची मांडणी आणि ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक चळवळीशी जोडण्याच्या कार्यामुळे रूपेश कांबळे यांची निवड करण्यात आली.अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या निवड समितीने सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा आढावा घेत ही निवड जाहीर केली. संस्थापक बा.रा. वाघमारे, प्रदेशाध्यक्ष डी.एस. वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव कांबळे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.रूपेश कांबळे यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील युवकांना सामाजिक प्रश्नांबाबत जागृत करण्यासाठी विविध अभियानांत सक्रिय सहभाग घेतला. सामाजिक समता, संविधानिक हक्क, शिक्षण आणि परिवर्तनवादी विचारांची नांदी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची राज्य स्तरावर झालेली दखल ही कंधार तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.पुरस्कार स्वीकारल्यानंतर रूपेश कांबळे यांनी हा सन्मान समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.घोडज सारख्या ग्रामीण भागातून सामाजिक कार्याची सुरुवात करून राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत पोहोचलेले रूपेश कांबळे हे आज अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना हा पुरस्कार नवी ऊर्जा देणारा ठरला आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
पैठण:( दि. २३ ऑगस्ट २०२६) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यान...
.jpeg)
COMMENTS