मुंबई, दि. १३ जून २०२६.मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराज यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच आता तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे. आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी करता करता आता सीटचोरी करू लागला आहे, त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत आला आहे. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला पण ज्या फॉर्म २६ वर ही माहिती दिली नाही असा आक्षेप आहे, त्या पानावर अशा पद्धतीचा कोणताच कॉलम नाही मग ती माहिती तरी कशी दिली जाणार, हा प्रश्न आहेच. काँग्रेसने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण निवडणूक प्रक्रिया संपल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मुळात जी नोटीस होती ती नोटीसच चुकीची असून नटराजनन यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट करून तेलंगणातील न्यायालयाने ती नोटीसच रद्द केली आहे. भाजपामध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी, असेही सपकाळ म्हणाले..भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ ही उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांनी सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळही पंढरपूरात जाऊन उपोषण करणार.
मिनाक्षी नटराजन यांना दिलेली नोटीसच रद्द; पुन्हा निवडणूक घ्या; निवडणूक अर्ज रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? मुंबई, दि. १३ जून २०...
मिनाक्षी नटराजन यांना दिलेली नोटीसच रद्द; पुन्हा निवडणूक घ्या; निवडणूक अर्ज रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार?
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
COMMENTS