भोपाळवाडी ता. लोहा दि 16
शाळेच्या संस्कारी अंगणातच विद्यार्थी विकासाचा प्राजक्त फुलतो , बहरतो आणि मोठा होतो . असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे . ते शाळेच्या पहिल्या दिवशी भोपाळवाडी ता. लोहा येथील कै. बळीराम पाटील प्राथमिक विद्यालय या शाळेत प्रवेशित इयत्ता पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आले होते . त्या प्रसंगी विद्यार्थी , शिक्षक आणि पालकांना केलेल्या मार्गदर्शनपर संवादात डॉ नांदेडे बोलत होते . पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षकांनी केलेल्या संस्कारांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो आणि विद्यार्थी देशाच्या सेवेसाठी तत्पर होतात ...
डॉ नांदेडे यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील नवी कोरी पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली . शाळेचे उपक्रमशील मुखाध्यापक माधव भोपाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून केलेल्या प्रास्ताविक भाषणात शाळेतील गेल्या अनेक वर्षातील प्रगतीचा आलेख सादर केला . संस्थेचे उपक्रमशील अध्यक्ष मारोती निवृत्ती पाटील घोरबांड यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या या प्रवेशोत्सवाचे महत्व समजाऊन सांगितले ... काही पालकांनी या वेळी राज्याच्या माजी शिक्षण संचालकांशी मन मोकळा संवाद साधला . सामाजिक , शैक्षणिक समस्यांची उकल करण्याच्या आणि विद्यार्थी गुणवत्ता वृध्दिंगत करण्याच्या मार्गातील अडथळ्यांचे निराकरण करण्यासाठीच्या उपायांची चर्चा केली . शाळेच्या पहिल्या दिवशीच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पुष्प देऊन स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले . प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक माधव भोपाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राजश्री कंधारे यांनी मानले .

COMMENTS