NEET घोटाळ्याचा 'मराठवाडा पॅटर्न': आलिशान हॉटेल्समध्ये कोट्यवधींचे डील; १० दिवस आधीच मोबाईलवर आली होती उत्तरपत्रिका! RCC चा शिवराज मोटेगावकर ९ दिवस, तर पेपर सेटर मनीषा मांडरे १४ दिवसांच्या CBI कोठडीत; संपूर्ण साखळी उघड!

विशेष प्रतिनिधी नांदेड / लातूर: देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लातूर-नांदेडच्या शैक्षणिक प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या NEE...

विशेष प्रतिनिधी नांदेड / लातूर: देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या लातूर-नांदेडच्या शैक्षणिक प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत धक्कादायक खुलासे होत आहेत. आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला ९ दिवसांची, तर थेट NTA च्या पेपर सेटिंग कमिटीची सदस्य असलेली पुण्याची बायोलॉजी लेक्चरर मनीषा मांडरे हिला १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे मराठवाड्यासह संपूर्ण देशातील शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.

 सर्वात मोठा खुलासा: परीक्षा ३ मे रोजी, पेपर २३ एप्रिललाच लीक!

सीबीआयच्या तपासात सर्वात खळबळजनक बाब समोर आली आहे. ३ मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेचा मूळ पेपर आणि त्याची उत्तरे (Answer Key) शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये तब्बल १० दिवस आधी, म्हणजेच २३ एप्रिल रोजीच आली होती.
मोटेगावकर आणि निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (ज्याने आरसीसीमध्ये काही काळ अध्यापन केले होते) हे दोघे सतत संपर्कात होते.
मोटेगावकरच्या मोबाईलमधून हा पेपर 'विवेक पाटील' नावाच्या व्यक्तीला आणि अनेक लाभाभार्थी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला.
स्वतःचा बचाव करण्यासाठी मोटेगावकर याने सर्व तांत्रिक पुरावे नष्ट केले होते, मात्र सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमने हा संपूर्ण डिलीट केलेला डेटा रिकव्हर करून मोटेगावकरला गोत्यात आणले आहे.
आलिशान हॉटेल्समध्ये 'लाईव्ह' पेपर आणि कोट्यवधींचे व्यवहार!
या रॅकेटची मोडस ऑपेरांडी (काम करण्याची पद्धत) एखाद्या सस्पेन्स चित्रपटासारखी होती: १. मोफत टेस्ट सिरीजचे आमिष: सुरुवातीला टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार प्रश्नसंच देऊन श्रीमंत पालकांचा विश्वास जिंकला जायचा. २. गुप्त बैठका: परीक्षेच्या दोन दिवस आधी लातूर, पुणे आणि इतर शहरांतील आलिशान हॉटेल्समध्ये गुप्त बैठकांचे आयोजन केले जायचे. ३. मोबाईल जप्त आणि लाईव्ह वाचन: संबंधित पालकांना आणि विद्यार्थ्यांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलावून आधी त्यांचे मोबाईल जप्त केले जायचे. त्यानंतर त्यांच्यासमोर हस्ताक्षरातील 'लाईव्ह' प्रश्नपत्रिका आणि उत्तरे ठेवून ती पाठ करून घेतली जायची. ४. आर्थिक करार: अर्धी रक्कम आगाऊ (Advance) आणि उर्वरित रक्कम परीक्षा झाल्यानंतर, अशी कोट्यवधी रुपयांची डील ठरली होती.
 शिक्षकांना लाखोंचे पगार; 'आरसीसी'चे साम्राज्य आणि आता सुट्ट्यांचे नाटक!
मोटेगावकर याने उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा या हिंदी पट्ट्यातील प्राध्यापकांना भाडेतत्त्वावर आणून आरसीसीचे जाळे पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला येथे पसरवले होते. या शिक्षकांना महिन्याला लाखोंचा पगार आणि तासिका पद्धतीवर प्रचंड मानधन दिले जायचे.
दरम्यान, मोटेगावकरला बेड्या ठोकल्याचे पडसाद क्लासेसवर पडले आहेत. २० मे पासून लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या सीबीआयच्या भीतीने आजपासूनच घाईघाईत जाहीर करण्यात आल्या असून क्लासेस पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसेच, कारवाईच्या भीतीने वाशीममधील एका प्रसिद्ध डॉक्टरसह नांदेडमधील अनेक श्रीमंत पालकांनी आपले मोबाईल बंद करून शहर सोडल्याची माहिती आहे. काही पालकांनी तर "पैसे गेले तरी चालतील, पण चौकशी नको" अशी पळपुटी भूमिका घेतली आहे.
संपूर्ण साखळी तपासाच्या रडारवर:
सीबीआयच्या तपासात मनीषा वाघमारे (ब्युटिशियन, जिने श्रीमंत ग्राहक शोधले) आणि धनंजय लोखंडे यांच्यासह राजस्थानच्या जयपूरमधील मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. संशय टाळण्यासाठी या टोळीने संपूर्ण पेपर एकाच वेळी न देता विषयानुसार (उदा. रसायनशास्त्राची जबाबदारी कुलकर्णीकडे) वेगवेगळ्या भागांत लीक केला होता.
गंगाधर गायकवाड यांचा  कडक सवाल: "ज्या शिक्षकांनी आणि पालकांनी संगनमत करून परीक्षेआधीच १० दिवस प्रश्नपत्रिका हॉटेल्समध्ये बसून घोकून घेतली, ते उद्या कसले डॉक्टर बनणार? हा केवळ परीक्षा घोटाळा नाही, तर मराठवाड्याच्या गुणवत्तेवर डाग लावणारा 'शैक्षणिक दरोडा' आहे. सीबीआयने आता एनटीए (NTA) च्या बड्या अधिकाऱ्यांसह या सर्व दीड हजार श्रीमंत पालकांना बेड्या ठोकून तुरुंगात डांबलेच पाहिजे!"
मराठवाड्याच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक ताज्या अपडेटसाठी 'ग्लोबल मराठवाडा' पाहत राहा!

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group