नांदेड शहरातील सांगवी भागात राहणारे सुनील मोरे कार्यरत हदगाव तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक यांनी शिक्षणाधिकारी किसन फोले व विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे यांच्या जाचाला कंटाळून चिमुकल्या दोन मुलासह आमदुरा येथील गोदावरी नदी कारसह आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक. शिक्षणाधिकारी हे शिक्षकांना कशाप्रकारे त्रास देतात सुनील मोरे यांच्या दुर्दैवी आत्महत्याने प्रकरण चव्हाट्यावर आले. आत्महत्या पूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर शिक्षणाधिकारी किशन फोले.विस्तारअधिकारी सूर्यकांत बाचे यांनी कशाप्रकारे मानसिक. शारीरिक. शासकीय कामातून त्रास देतात सविस्तर लिहिले होते. एका शिक्षकाला व त्याच्या कुटुंबाला जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे काम हदगाव चे गटशिक्षणाधिकारी किशन फोले. विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे यांनी केले. त्यांना तात्काळ अटक करावे. याप्रकरणी उच्चस्तरीय डीवायएसपी मार्फत सखोल चौकशी तसेच शिक्षण विभागातअजून किती शिक्षकांना त्रास देण्याचे काम मातब्बर शिक्षणाधिकारी करत आहेत याची सखोल चौकशीतून निष्पन करावे.
अशी मागणी नांदेड येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केले.

COMMENTS