मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यात सलगच्या पावसाच्या खंडाने पिके करपली असून बऱ्याच ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी भर दिसत अस...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यात सलगच्या पावसाच्या खंडाने पिके करपली असून बऱ्याच ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी भर दिसत असून त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत देऊन दुष्काळाच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी पुत्रांनी तहसीलदार शंकर लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत निवेदनात असे नमूद करण्यात आले की शेतकऱ्यांना जनावराचे वैरण जुलै महिना पुरेल इतके नियोजन असते पण जुलै अखेरीस पण पावसाचा खंड कायम असून जनावराचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकारने तत्काळ चारा छावण्या उघडन्यात याव्यात, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची तातडीची मदत घोषित करावी, विनाअट पीककर्ज माफ करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि महावितरण चे भारनियमन थांबवावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी बालाजी पाटील ढोसणे, गिरीधर पाटील केरुरकर, शिवशंकर पाटील कलबरकर, रमाकांत पाटील जाहूरकर, निळकंठ पाटील कोळनुरकर, निशिकांत पाटील इंगळे, किशोर देशमुख, प्रशांत देशमुख, नारायण देशमुख, अंकुश हावरगे मावलीकर यांच्यासह शेतकरी पुत्र उपस्थित होते.

COMMENTS