नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मोलाचे योगदान देणारे गोविंदभाई श्रॉफ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अद्यक्ष प्रशान्त चौधरी यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.गोविंदभाई श्रॉफ यांनी मराठवाड्यात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे व्ही. आर चिलवरवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याची माहिती जाणून घेऊन शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.प्रस्ताविक पर्यवेक्षिका योजना बच्चेवार, सूत्रसंचालन व्ही. आर. चिलवरवार, आभार श्रद्धा सावले यांनी मानले.यावेळी शाळेतील उषा कंधारे,अरविंद काळे, शिवराज कदम मनीषा वानेगावकर,मंजुषा वानखेडे, पुल्लावार,अनिता गुंडेवार,दीपिका यादव, कांबळे मामा, श्रीराम बॉईनवाड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
COMMENTS