नांदेड/प्रतिनिधी-भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा किनवट नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कॉ. गंगारेड्डी बैनमवार यांचे आज पहाटे अल्पशा...
नांदेड/प्रतिनिधी-भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा किनवट नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कॉ. गंगारेड्डी बैनमवार यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कॉ. गंगारेड्डी बैनमवार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आजीवन सभासद होते. किनवट नगरपरिषदेत ते दीर्घकाळ नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी दोन वेळा उपनगराध्यक्षपद भूषविले तसेच विविध समित्यांचे सभापती म्हणूनही काम पाहिले. कॉ. व्ही. डी. देशपांडे, अनंतराव नागापूरकर, गोपाळराव कुर्तडीकर, उस्मान खान आणि सरदार खान यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी दशेतच त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. दिवंगत आमदार सुभाष जाधव यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी किनवटमध्ये पक्ष संघटना मजबूत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष दीर्घकाळ नगरपरिषदेत सत्तेत राहिला. पक्षात त्यांनी जिल्हा सचिव, राज्य कौन्सिल सदस्य आदी विविध पदांवर कार्य केले होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो यांनी श्रद्धांजली अर्पण करताना, कॉ. गंगारेड्डी बैनमवार यांच्या निधनाने पक्षाचा एक निष्ठावंत शिलेदार आणि सहकारी गमावला आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य प्रदीप नागापूरकर यांनी राजकारणात पक्षनिष्ठा कशी जपावी हे शिकवणारे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

COMMENTS