माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील पानोळा गावाजवळील साई कन्स्ट्रक्शन (कुपटी) कॅम्पवर झालेल्या दुर्दैवी घटनेत जेसीबी ऑपरेटर अजितकुमार टुकन य...
माहूर (प्रतिनिधी)
माहूर तालुक्यातील पानोळा गावाजवळील साई कन्स्ट्रक्शन (कुपटी) कॅम्पवर झालेल्या दुर्दैवी घटनेत जेसीबी ऑपरेटर अजितकुमार टुकन यादव (वय 31) यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी माहूर पोलिसांनी दि. 3 मे रोजी हायवा चालक अजय रामदास मलगाम (वय 28, रा. गोकुळ गोंडेगाव ता. माहूर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 125 (बी) व 106(1) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
मृतकाचा भाऊ राजदेव टुकन यादव (वय 36) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2 मे रोजी रात्री आकाश यादव यांनी फोनवरून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता, भावाचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे नेण्यात आल्याचे समजले. रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, अजितकुमार यादव मृत अवस्थेत आढळले.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, साई कन्स्ट्रक्शन कॅम्पमधील एमएच 26 सीएच 9300 क्रमांकाच्या हायवा चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिल्याने अजितकुमार खाली पडले आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर माती कोसळून ते दबले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित चालक अजय मलगाम याने मात्र दूरध्वनीवरून आपली बाजू मांडताना, “अपघातग्रस्त हायवावर मी चालक नव्हतो, मला नाहक गोवले जात आहे,” असा दावा केला आहे!
पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी वीजपुरवठा नसल्याने मजूर व कर्मचारी इतरत्र झोपले होते. हायवा गाडी मागे घेत असताना माती अंगावर पडून मृत्यू झाल्याचे काही मजुरांनी सांगितले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती रात्रीच मिळाल्यानंतरही जखमीला तत्काळ रुग्णालयात का नेण्यात आले नाही? तसेच घटनेतील नेमकी कारणमीमांसा काय? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पुढील तपास सपोनि शरद घोडके हे करीत आहेत.

COMMENTS