नायगाव / प्रतिनिधी नांदेड येथील नमस्कार चौक गजानन नगर सोसायटी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव नारायण बसवंते यांचा दि.१० मे रोजी परळी...
नायगाव / प्रतिनिधी नांदेड येथील नमस्कार चौक गजानन नगर सोसायटी येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव नारायण बसवंते यांचा दि.१० मे रोजी परळी वैजनाथ येथील हॉटेल भागवत पॅलेस मध्ये मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय महाराष्ट्र लोक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक लोकनेताच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने,अभिनेत्री मेघना झुझम,बाप आयटी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष घुगे,डॉ.मयंक गांधी (संस्थापक GVT),जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहेमान,पोलीस निरीक्षक नाचेन, नगराध्यक्षा पद्यश्रीताई धर्माधिकारी, दैनिक लोकनेता चे संपादक ज्ञानेश्वर मुंढे यांच्या हस्ते शाल.पुष्पहार सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आले.किसनराव बसवंते हे एक व्यक्तिमत्व आदर्श शिक्षक म्हणून सर्वत्र परिचित होते त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच अग्रेसर राहिले आहेत यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक लोकनेता परिवाराच्या वतीने दिला जाणारा राज्य स्तरीय महाराष्ट्र लोक भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS