नांदेड ग्रामीण मंडळातील त्रिकुट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात संपन्न शिबिरात 745 दाखले व 896 प्रमाणपत्रांचे वितरण

   नांदेड, दि. ११ मे  : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महार...

 

 नांदेड, दि. ११ मे  : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” चे आयोजन नांदेड ग्रामीण मंडळातील मौजे त्रिकुट येथील  गणपती मंदिर येथे  करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेऊन लाभ घेतला.सदर शिबिरास नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंदराव पा.तिडके बोंढारकर उपस्थित होते. तसेच उपविभागिय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, मंडळ कृषी अधिकारी सुनिल सानप ,महावितरणचे अभियंता राखे, बाळू पाटिल मोरे ब्राम्हणवाडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळातील विविध गावांचे सरपंच व इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार आनंदराव तिडके बोंढारकर यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. या शिबिराच्या माध्यमातून महसुली कामे तात्काळ मार्गी लागत आहेत. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असून “शासन आपल्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत महसूल, कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महिला व बालकल्याण, विशेष सहाय्यनयोजना, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक, निवडणूक विभाग तसेच आपले सरकार सेवा केंद्र,आधार केंद्र चालक यांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संजय वारकड यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या शिबिरामध्ये सातबारा व ८-अ चे एकूण 745 दाखले वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी, वय, जातीचे तसेच अल्पभूधारक प्रमाणपत्र आदी मिळून एकूण 896 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय  गांधी निराधार योजनेअंतर्गत 03 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले असून 15 लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात आली.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या गट अदलाबदलीद्वारे सातबाराचे वितरण करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.शिबिरामध्ये विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. विशेषतः सातबारा व ८-अ वितरण, आधार दुरुस्ती, आपले सरकार सेवा केंद्र, जनगणनेतील स्व-गणना, आरोग्य तपासणी, वन विभाग, विशेष सहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना ),कृषी विभाग,महावितरण, क्रिडा विभाग, शिक्षण विभाग,आशाताई व अंगणवाडी ताई ,आपले सरकार सेतू केंद्र आदी स्टॉलना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विविध योजनांची माहिती घेऊन अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार महसूल  सुनील माचेवाड तसेच मंडळ अधिकारी  अनिरुद्ध जोंधळे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी वसंत मंगल व सचिन उपरे तसेच तालुक्यातील महसूल सेवक श्रीमती आरती सारंग व अजिंक्य सुरोशे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group