'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज...
'स्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैविकशास्त्र संकुल व हरियाणा गुरुग्राम येथील वॉटर्स बायो सायेन्सस यांच्या संयुक्त विद्यमाने “अद्यावत पेशी विश्लेषण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.१० मे, २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात सातत्याने अद्ययावत राहिले पाहिजे, या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या विद्यार्थी विकासाभिमुख भूमिकेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश वाढेर हे होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अंकिता परब आणि श्री मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले.
अंकिता परब यांनी फ्लो सायटोमेट्री या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देताना कर्करोग निदान, अन्न व हवा प्रदूषण तपासणी, मूल पेशी शोध, पेशी विभाजन अवस्था, पेशी विकास, पेशी चक्रातील बदल, गुणसूत्रांची संख्या, नियत पेशी मृत्यू, औषध शोध आदी क्षेत्रांतील त्याच्या उपयोगांवर प्रकाश टाकला.
यावेळी व्यासपीठावर डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. लक्ष्मीकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी “समस्येला समस्या न समजता संधी म्हणून पाहा,” असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन रुबिया शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश धुलधज यांनी केले.
या कार्यशाळेस डॉ. परशुराम पवार व डॉ. नागेश ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. बी. एस. सुरवसे, सहसंयोजक डॉ. सुनील हजारे, आयोजन सचिव डॉ. उमेश धुलधज, डॉ. ए. पी. पाठक, डॉ. हेमलता भोसले, डॉ. मिलिंद गायकवाड, गोविंद सूर्यवंशी, प्रतिभा ढवळे, समरीन पठाण, विद्या सुकरे, डॉ. चव्हाण, वसुधा कोडगिरे, राजू शेरे, सय्यद खाजा व सुशील खरवडकर यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS